Mosques Covered In UP : होळीनिमित्त उत्तरप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत ताडपत्रीद्वारे झाकण्यात आल्या मशिदी !

ताडपत्रीद्वारे झाकण्यात आलेली मशीद

अलीगड (उत्तरप्रदेश) – होळीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील संभल, अलीगड आदी जिल्ह्यांमधील मशिदी ताडपत्रीने झाकण्यात आल्या आहेत. मशिदींवर रंग उडू नये, हा यामागील उद्देश आहे. संभल, शाहजहांपूर, अलीगड यांसारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता बाळगली जात आहे.

शाहजहांपूरमध्ये होळीच्या दिवशी लाट साहेबांची मिरवणूक काढली जाते. त्यासाठी शहरातील अनुमाने ६७ मशिदी आणि दर्गे यांना ताडपत्रीने झाकण्यात आले आहेत.


काय असते लाट साहेबांची मिरवणूक ?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहजहांपूरमध्ये लाट साहेबांच्या मिरवणुकीची परंपरा चालू झाली. यामध्ये इंग्रजांचे प्रतीक म्हणून एका व्यक्तीला लाट साहेब बनवले जाते आणि म्हशीच्या गाडीतून फिरवले जाते. या वेळी त्याला झाडूने मारले जाते. यासह त्या बूट आणि चप्पल यांचा हार घातला जातो. ज्या व्यक्तीला लाट साहेब व्हायचे असते तो संमतीने मिरवणुकीत येतो, त्या बदल्यात त्याला ५० सहस्र रुपये दिले जातात.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या सणांचा रंग मशिदीवर उडू न देण्यासाठी इतका खटाटोप करणारे मुसलमान कधीतरी हिंदूंशी बंधुभावाने राहु शकतील का ? तरीही हिंदु-मुसलमान भाई भाईचा गेली १०० वर्षे जो आटापिटा केला जात आहेत, तो किती हास्यास्पद आहे, हेच ही घटना स्पष्ट करते !
  • हिंदु मुसलमानांच्या सणांमध्ये सहभागी झाले की, ‘धर्मनिरपेक्षता’ आणि मुसलमानांनी हिंदूंच्या सणांना विरोध केला की त्यांचा तो अधिकार ! अशा प्रकारावर मौन बाळगणारे निधर्मीवादी हिंदूंची फसवणूक करत आहेत, हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?