|
दापोली (जिल्हा रत्नागिरी) – होळीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील अडखळ तरीबंदर येथे जेट्टीवर बसण्याच्या जागेवरून आणि ‘डंपर’ लावण्याच्या कारणावरून स्थानिक मोहल्ल्यातील मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून स्वसंरक्षणार्थ हिंदूंनीही त्याचा प्रतिकार दगडफेक करून केला. यामुळे येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना १२ मार्चच्या सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. हाणामारीत १४ जण घायाळ झाले असून ८ वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. घायाळांवर दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. पाजपंढरी आणि अडखळ गावांत रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचे अधिक अन्वेषण पोलीस करत आहेत.
🚨 Disturbing News: Hindus Attacked in Adkhal, Ratnagiri District 🚨
A minor issue escalated into stone pelting and violence against Hindus by some Mu$l!ms in Adkhal on the eve of Holi 🎨
The aftermath: 14 people injured, 8 vehicles vandalized.
This incident highlights a… pic.twitter.com/TbiiSI0caq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 14, 2025
१. मिळालेल्या माहितीनुसार अडखळ तरीबंदर येथे जेट्टीवर बसण्याच्या जागेवरून आणि वाहने लावण्यावरून अधूनमधून दोन्ही गटांत कुरबुरी होत असतात.
२. शिमग्याच्या सणानिमित्त हिंदु मासेमारांनी स्वत:च्या नौका अडखळ मोहल्ल्याशेजारी खाडीमध्ये उभ्या केल्या होत्या. ‘या वेळी आमच्या नौकेला धोका निर्माण होऊ शकतो’, अशी भीती पाजपंढरी येथील या हिंदु मासेमारांनी व्यक्त केली होती.
३. १२ मार्चला एका हिंदु तरुणाने एका वाहनाचे छायाचित्र काढल्यानंतर मोहल्ल्यातील मुसलमान तरुणाने ‘वाहनाचे छायाचित्र का काढले ?’, अशा प्रकारे जाब विचारला.
४. त्यानंतर लगेचच मोहल्ल्यातील काही मुसलमान तरुण आणि महिला यांनी तेथील हिंदूंवर जोरदार दगडफेक केली. (मुसलमान महिला यासुद्धा हिंदुद्वेष्ट्या असतात, हे सांगणारी ही आणखी एक घटना ! – संपादक)
५. त्यानंतर पाजपंढरी आणि अडखळ मोहल्ला येथील जमाव समोरासमोर आला अन् एकमेकांवर दगडांचा मारा केला. यामध्ये अनुमाने १४ जण घायाळ झाले.
६. या मारहाणीची माहिती दापोली पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर येथील पोलीस निरीक्षक विवेक अहिरे अन्य पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी जमावाला शांत करण्याच्या प्रयत्न केला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही अडखळ येथे जाऊन परिस्थितीची पहाणी केली.
७. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून रात्री शांतता समितीची बैठकही घेण्यात आली. अधीक्षक कुलकर्णी यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांशी चर्चा केली. तसेच लोकांना शांतता कायम राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले.
पोलिसांची भूमिका संशयास्पद !
या घटनेविषयी स्थानिक सूत्रांनी ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रथम दोन्ही गटांतील १०-१० जणांना दापोली पोलीस ठाण्यात बोलावले. त्यामुळे काही प्रमुख हिंदु कार्यकर्ते दापोलीला गेले; मात्र संबंधित पोलीस अधिकारी ज्या ठिकाणी घटना घडली, तेथील म्हणजे हर्णे पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी हर्णे येथील अन्य काही हिंदु कार्यकर्त्यांना तेथे बोलावले. ‘तुम्ही निरोप दिल्याप्रमाणे आमचे प्रमुख दापोलीत गेले आहेत’, असे कार्यकर्त्यांनी हर्णे पोलीस ठाण्यात सांगितले. या वेळी पोलिसांनी प्रकरण मिटवण्यास सांगून कार्यकर्त्यांना घरी जाण्यास सांगितले.
दापोली पोलीस ठाण्यात मात्र दोन्ही गटांच्या ७ – ७ जणांची पोलिसांसमोर चर्चा झाली. पोलीस म्हणाले, ‘‘सण चालू आहे. शांतता हवी. आम्ही बंदोबस्त वाढवू. त्या ठिकाणी १० पोलीस ठेवू.’’ या वेळी प्रमुख हिंदु कार्यकर्त्यांनी ‘शिमगा सणामध्ये आमच्या ज्या नौका मानाला जाणार आहेत, त्या वाजत-गाजत खालच्या बाजूने जाणार आहेत’, असे सांगितले. पोलिसांनी ‘खालून वाजवत जायचे नाही’, असे सांगितले. मात्र पोलिसांच्या या वक्तव्याला हिंदूंनी विरोध केला. त्यानंतर मात्र कोणतेही गालबोट लागू नये; म्हणून पोलीस बंदोबस्तात सण साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता ! |