अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मराठा महासंघ आणि शिवप्रेमी यांची मागणी

मराठा महासंघ १९ मेनंतर ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथील जामा मशीद अंजनेय मंदिरावर बांधल्याची हिंदूंची भूमिका !

अन्याय आणि शांतता एकाच वेळी नांदू शकत नाहीत ! हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ एकदाचा रहित करून हिंदूंची सर्व मंदिरे त्यांच्या स्वाधीन केली पाहिजेत !

केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

पुरातत्वीय उदासीनता !

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातही पुरातत्व विभागाची भूमिका काय ? न्यायालयात सर्वेक्षणाची मागणी केल्यानंतर ते करण्यात आले. पुरातत्व विभागाने ते स्वतःहून का नाही केले ? ऐतिहासिक वारशांचे केवळ जतन करणे पुरेसे नसते, तर त्या वारशाशी निगडित दबलेला सत्य इतिहास समोर आणण्याचे कर्तव्यही पुरातत्व विभागाचे नाही का ? भारतात तर हे फार महत्त्वाचे आहे !

सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल सादर करण्यास २ दिवसांची मुदत

‘एकूण ३ दिवस सर्वेक्षण, चित्रीकरण झाले. २५० छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर केला जाऊ शकतो; मात्र या सर्वांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी २ दिवस लागतील’, असे सांगत मुदत मागितली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

कुतूबमिनार आणि ताजमहाल केंद्र सरकारने हिंदूंकडे सोपवावे ! – काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांची मागणी

काँग्रेसचे राज्य असतांना काँग्रेसने असे का केले नाही आणि कृष्णम यांनी इतकी वर्षे हे का सांगितले नाही ?

श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या भूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहही सील करावे ! – हिंदु पक्षाची मागणी

या ठिकाणी मुसलमान पक्षाकडून छेडछाड केली जाऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे येथे संरक्षण देण्याची मागणी याचिकाकर्ते महेंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे.

ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामध्ये पक्षकार करण्याची हिंदु सेनेची मागणी

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ‘या खटल्यात आम्हालाही पक्षकार बनवून घ्यावे’, अशी मागणी हिंदु सेना या संघटनेकडून करण्यात आली आहे.

ज्ञानवापी परिसरातील कुंडामध्ये सापडले शिवलिंग !

१२ फूट व्यास आणि ४ फूट उंच शिवलिंग !
विहीर परिसर न्यायालयाकडून सील
परिसराला पोलीस संरक्षण

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?

हिंदू कधीही दुसर्‍याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करत असल्यामुळे हिंदूंनाच दोषी ठरवले जात आहे.’’