ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.

देहलीतील ‘औरंगजेब लेन’ला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ नाव देण्याची भाजपची मागणी

नवी देहली येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’, असे विधान देहली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष वासू रखड यांनी केले आहे.

कुतूबमिनार नव्हे, सूर्यस्तंभ !

देश ‘स्वच्छ’ होण्याचा ध्यास घेतलेले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आता पुरातत्व विभागही स्वच्छ करण्यासाठी हा विभाग विसर्जित करून तेथे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, खऱ्या इतिहासतज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे झाल्यास भारताचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर येण्यास वेळ लागणार नाही आणि हिंदु राष्ट्राच्या दिशेने टाकलेले ते एक पाऊलच असेल !

पर्यटकांना औरंगजेबाच्या थडग्याला ५ दिवस देता येणार नाही भेट !

केवळ ५ दिवसच कशाला ? क्रूरकर्म्याच्या थडग्याला भेट देण्याचा प्रकार कायमचाच बंद करा !

कुतूबमिनार हिंदु वास्तूशास्त्रानुसार बांधलेले सूर्यस्तंभ ! – पुरातत्व तज्ञ धर्मवीर शर्मा

कुतूबमिनार येथील हिंदु आणि जैन यांची मंदिरे पाडून तेथे बांधण्यात आलेल्या कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीच्या खांबांवर देवतेची एक मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती भगवान नरसिंह आणि भक्त प्रल्हाद यांची आहे, ही माहिती धर्मवीर शर्मा यांनी दिली.

श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने स्वीकारली !

या याचिकेद्वारे श्रीकृष्णजन्मभूमी हिंदूंची असल्याचा दावा करण्यात आला आहे, तसेच या ठिकाणी सध्या असणारी शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ज्ञानवापी परिसरात सापडलेले अवशेष मंदिरांचेच असण्याची शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा

ज्ञानवापीच्या घुमटाखाली मंदिराचे मूळ घुमट ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर ऑफ पॅरिस लावून लपवण्यात आले आहे.

देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळले, त्याप्रमाणे गोव्यातही आढळू शकते ! – सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

‘पोर्तुगीज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे’, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ही मंदिरे पुन्हा उभारावी, असे केवळ माझे वैयक्तिक मत नसून सर्वांचीच तशी भावना आहे.’’