कुतूबमिनार आणि ताजमहाल केंद्र सरकारने हिंदूंकडे सोपवावे ! – काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांची मागणी

प्रमोद कृष्णम यांची मागणी

नवी देहली – कुतूबमिनार आणि ताजमहाल सध्या भारत सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे सरकारने कुतूबमिनार आणि ताजमहाल हिंदूंच्या नियंत्रणात द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. ‘आम्ही देशासमवेत आहोत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुतूबमिनारला ‘विष्णु स्तंभ’ आणि ताजमहालला ‘तेजोमहल’ घोषित करण्याची मागणी हिंदु संघटनांकडून होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये ताजमहालमधील २२ खोल्या उघडण्याची याचिकाही प्रविष्ट करण्यात आली होती.

ज्ञानवापीविषयी प्रमोद कृष्णम म्हणाले की, ज्ञानवापीचे सूत्र श्रद्धा आणि भारतीय जनभावनेशी जोडलेले आहे. ते न्यायालयामध्ये विचाराधीन आहे; मात्र आतापर्यंत शिवलिंग का लपवून ठेवले आणि कुणी लपवून ठेवले ? प्रत्यक्षात पुराव्याची आवश्यकता नसते; परंतु न्यायव्यवस्थेचा जो आदेश असेल, तो सर्वांना पाळावा लागेल.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे राज्य असतांना काँग्रेसने असे का केले नाही आणि कृष्णम यांनी इतकी वर्षे हे का सांगितले नाही ?