श्रीरंगपट्टण (कर्नाटक) येथील जामा मशीद अंजनेय मंदिरावर बांधल्याची हिंदूंची भूमिका !

जामा मशीद

बेंगळुरू (कर्नाटक) – वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे केलेले सर्वेक्षण आणि आगऱ्यातील ताजमहालमध्ये शिवलिंग असल्याच्या चर्चेनंतर आता कर्नाटकच्या श्रीरंगपट्टण येथील जामिया मशिदीच्या संदर्भातही अशाच प्रकारचा दावा करण्यात आला आहे. टिपू सुलतानच्या सत्ताकाळात येथील अंजनेय (हनुमान) मंदिरावर जामिया मशीद बांधण्यात आली असून त्याचे ऐतिहासिक पुरावेही आहेत. हे मूळ मंदिराचे बांधकाम असून त्याला मशिदीमध्ये रूपांतरित करण्यात आले, असे राज्यातील काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी या मशिदीत अंजनेयच्या मूर्तीची पूजा करण्याची अनुमती मागितली आहे. या मागणीसाठी त्यांनी उपायुक्तांना निवेदनही दिले आहे. निवेदनात म्हटले की, पुरातत्व विभागाने ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास करून या प्रकरणाचे अन्वेषण करावे.

संपादकीय भूमिका

अन्याय आणि शांतता एकाच वेळी नांदू शकत नाहीत ! हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ एकदाचा रहित करून हिंदूंची सर्व मंदिरे त्यांच्या स्वाधीन केली पाहिजेत ! म्हणजे अशा प्रकारे एकेका मंदिरावर हिंदूंना आपला अधिकार असल्याची मागणी अन् शक्ती व्यय करावी लागणार नाही !