श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या भूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहही सील करावे ! – हिंदु पक्षाची मागणी

श्रीकृष्ण जन्मभूमी

मथुरा (उत्तरप्रदेश) – वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची जागा सील करण्याची मागणी हिंदु पक्षाने केल्यानंतर न्यायालयाने ती जागा सील करत तेथे पोलीस संरक्षण दिले आहे. या पार्श्‍वभूमीवर मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या भूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृह हेही सील करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात करण्यात आली आहे.

या ठिकाणी मुसलमान पक्षाकडून छेडछाड केली जाऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे येथे संरक्षण देण्याची मागणी याचिकाकर्ते महेंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे. यापूर्वीच ज्ञानवापीप्रमाणे शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर १ जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे.