जोतिबा यात्रा विशेष !
कोल्हापूर, ११ एप्रिल (वार्ता.) – जोतिबा यात्रेसाठी येणार्या भाविकांसाठी पंचगंगा नदीच्या काठावर ‘शिवाजी चौक तरुण मंडळा’च्या वतीने ११ एप्रिल या दिवशी अन्नछत्राचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, माजी महापौर श्री. नंदकुमार वळंजू, श्री. सुहास भेंडे यांसह अन्य उपस्थित होते. या प्रसंगी श्री. नंदकुमार वळंजू म्हणाले, ‘‘गेले १५ दिवस आमचे कार्यकर्ते यासाठी नियोजन करत असून जोतिबा यात्रेच्या निमित्ताने येणारा एकही भाविक महाप्रसादापासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. राज्यातून आणि परराज्यातून येणार्या प्रत्येक भाविकाची सोय करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. गेली ३१ वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम चालू आहे.’’