
अनेक मुसलमान हिंदु धर्मात प्रवेश करत आहेत. अशा घटनांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ‘मुसलमानांची हिंदु धर्मात घरवापसी’, ही सध्याच्या काळातील उल्लेखनीय गोष्टच म्हणावी लागेल. देवबंद येथील योग साधना यशवीर आश्रमात १० मुसलमानांनी इस्लाम त्यागून नुकताच सनातन (हिंदु) धर्मात पुनर्प्रवेश केला. स्वामी यशवीर महाराजांनी शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर संबंधित मुसलमान पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित केले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली. या मुसलमानांच्या पूर्वजांनी साधारणपणे ५० वर्षांपूर्वी सनातन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्या काळात इस्लामी शासकांनी दिलेल्या आमिषांच्या आहारी जाऊन त्यांनी सनातन धर्म सोडला होता. आता देशात चांगले सरकार आल्याने हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील एक महिला म्हणाली, ‘‘मी ५० वर्षांपूर्वी चूक केली होती. त्यामुळे आम्ही मुसलमान झालो. मी आता माझ्या धर्माकडे परत जात आहे. मी आता आनंदी आहे.’’ प्रत्येक वेळी हिंदूंनाच उपदेशाचे डोस पाजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता या महिलेच्या विधानाविषयी मात्र तोंडातून ‘ब्र’ही काढणार नाहीत. वर्ष २०२४ मध्ये शाहिना या मुसलमान युवतीने शिवम या हिंदु तरुणासमवेत न्यायालयात जाऊन वैदिक पद्धतीने विवाह केला. या घरवापसीमुळे शाहिनाने ती आनंदी आणि समाधानी असल्याचे सांगितले होते. थोडक्यात काय, तर खरा आनंद कशात आहे, हे केवळ हिंदु धर्मीयच जाणतात.
जे मुसलमान भारतात रहातात, त्यांपैकी अनेकांचे पूर्वज हे हिंदु होते, हे वास्तव अनेकांना ठाऊकच नाही. त्यामुळे बहुसंख्य होऊ पहाणार्या मुसलमानांच्या मागच्या पिढ्यांमधील हिंदु धर्म झाकोळला गेला आहे. तेव्हा हिंदु असणार्या या पूर्वजांवर इस्लामी राजवटीत अनन्वित अत्याचार झाले होते. त्याला कंटाळून किंवा आमिषेपोटी त्यांनी इस्लाम स्वीकारला. अर्थातच असे करण्यात तेव्हा त्यांना काही आनंद झाला नसणारच ! दबावापोटीच हे घडले असणार, हे सर्वश्रुत आहे; कारण इस्लामने आजवर बळजोरी केल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत आणि अजूनही ती घडत आहेत. धर्मांतरासाठी नकार दिल्यास संबंधितांची हत्या केल्याच्या किंवा त्यांना मारहाण केल्याच्याही घटना घडल्या आहेत. असे होऊ नये, यासाठी तेव्हा वरील घटनेतील मुसलमानांनी धर्मांतर केले असणार; पण आता कालौघात हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात आल्यावर त्यांनी धर्मपरिवर्तन केले. आतापर्यंत लक्षावधी मुसलमानांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. खरेतर धर्मांतरित झालेल्या मुसलमानांनी अशा उदाहरणांतून वेळीच बोध घेऊन त्यांच्या चुका सुधारायला हव्यात. सनातन धर्म सर्वांना स्वीकारायला आणि सामावून घेण्यास सिद्ध आहे. इस्लाम धर्म २ सहस्र वर्षांपूर्वी अस्तित्वात आला होता; पण सनातन (हिंदु) धर्म हा अनादी अनंत आहे. तो कुणावरही बळजोरी करत नाही, ना दबाव आणत, ना कधी हिंसा घडवत. तो चैतन्यदायी आणि अविनाशी आहे. हिंदु धर्माचा इतिहास आक्रमकांचा नाही, तर शूरवीर राजे-महाराजांचा, तसेच क्रांतीकारकांचा आहे. हे हिंदु धर्माचे अद्वितीयत्व आहे. यामुळेच तर अहिंदू हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करू लागले आहेत. हिंदु धर्म सामर्थ्यशाली आहे, हे तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडवू पहाणार्यांनी कायमचे लक्षात ठेवावे !
‘हिंदु धर्म सामर्थ्यशाली आहे’, हे तलवारीच्या जोरावर धर्मांतर घडवू पहाणार्यांनी कायमचे लक्षात ठेवावे ! |