हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांमागे असलेल्या जिहादी वृत्तीच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करा !

नगर येथील ‘हिंदु राष्ट्र्र-जागृती आंदोलना’त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

नगर येथे आंदोलन करताना हिंदुत्वनिष्ठ

नगर – देशात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या हत्यांसाठी जिहादी मानसिकता असलेलेल्या धर्मांधच कारणीभूत आहेत. अशा वृत्तीच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बापू ठाणगे यांनी येथे केले.

देशभरात हिंदूंच्या होणार्‍या हत्या आणि धर्मांतर, तसेच महाराष्ट्र्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात, यांविरोधात हिंदु जनजागृती समिती अन्य अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २७ ऑगस्ट या दिवशी नगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक चौपाटीकारंजा येथे ‘हिंदु राष्ट्र्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्या वेळी श्री. ठाणगे बोलत होते. यासह नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार्‍या अनेक हिंदूंना धमक्या देणार्‍या जिहाद्यांवरही कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.