भारताला ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी पाटलीपुत्र येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकजूट ! – हिंदु आघाडी

पाटलीपुत्र (बिहार) – भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची सिद्धता चालू आहे. यासमवेतच हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार करण्याचे प्रयत्न होत आहेत. या आघातांच्या पार्श्वभूमीवर पाटलीपुत्र येथील रुद्र शक्ती सेनेच्या कार्यालयात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते

हिंदु आघाडीच्या माध्यमातून आयोजित या बैठकीत रुद्र शक्ती सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु वाहिनी बिहार, अधिवक्ता आयोग, आओ स्कूल चले अभियान आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘पी.एफ्.आय.’वरील बंदीसाठी आंदोलन करणे, हलाल अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती करणे, तसेच भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंना संघटित करण्यासाठी नियमित बैठका आयोजित करणे, असे निर्णय यावेळी घेण्यात आले.