लव्ह जिहादच्या प्रकरणी जिवंत जाळलेल्या हिंदु तरुणीचा अंतत: मृत्यू !

दुमका (झारखंड) येथील अंकिता कुमारी हिला जाळल्याचे प्रकरण

अंकिता कुमारी

रांची (झारखंड) – राज्यातील दुमका येथे एकतर्फी प्रेमातून शाहरुख हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाने अंकिता कुमारी नावाच्या हिंदु मुलीवर २३ ऑगस्ट या दिवशी पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. यात ती ९० टक्के भाजली होती. मृत्यूशी झुंजत असलेल्या अंकिताचा अंतत: २७ ऑगस्टच्या रात्री मृत्यू झाला. हिंदुत्वनिष्ठ पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी या घटनेची माहिती देणारे ट्वीट केले आहे. येथील रिम्स रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते.

या घटनेवरून संपूर्ण दुमका जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध मार्च आणि बंद घोषित करण्यात आला आहे. पोलिसांनी शाहरुख हुसेन याला आधीच अटक केली असून जलदगती न्यायालयाद्वारे त्याला फाशी सुनावण्यात यावी, अशी सर्वत्रहून मागणी केली जात आहे.

शाहरुख हुसेन हा अंकिता कुमारीच्या शेजारीच रहायचा. तो तिच्यासमवेत मैत्री करण्यासाठी प्रयत्न करत असे. एके दिवशी अंकिताने त्यास विरोध केल्याने त्याने तिला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. २२ ऑगस्टच्या रात्री शाहरुखने अंकिता झोपलेली असतांना तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळले. तिची झोप मोडली, तेव्हा तिची पाठ जळत असल्याचे तिला लक्षात आले. त्यानंतर कुटुंबियांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत ती ९० टक्के जळाली होती. पोलिसांनी शाहरुखला त्याच दिवशी अटक केली.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, तुमच्या माता, भगिनी, पत्नी आणि मुली यांचे रक्षण करण्यासाठी आतातरी संघटित व्हा अन् लव्ह जिहादचा सामना करण्यासाठी शासनव्यवस्थेवर अवलंबून न रहाता तुम्ही स्वत: सक्षम बना !