
कोल्हापूर, २६ जून (वार्ता.) – कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीला बळकटी देण्यासाठी करण्यात येत असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याचे काम चालू आहे. या अंतगत परिसरातील मिळकतींचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात काही वैयक्तिक, तसेच काही व्यापारी मिळकती आहेत. साधारणत: २०० ते २२५ मिळकती असून यांच्या पुनर्वसनाचा प्राथमिक आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. यात या मिळकतधारकांना किती निधी द्यावा लागतो, याचा अहवाल सिद्ध करण्यात आलेला आहे. हे सिद्ध करण्यात आलेले मूल्यांकन शासनाला कळवून त्यावर एक-दोन पर्याय देऊन ते अंतिम केले जाणार आहे, अशी माहिती ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने देण्यात आली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !