
कोल्हापूर, २२ जुलै (वार्ता.) – सध्याची एकूण स्थिती पहाता विविध ठिकाणी, हिंदूंचे उत्सव यांवर आघात होत आहेत. एखादा हिंदू संकटात असेल, तर त्याला प्रत्येक वेळी साहाय्य मिळतेच असे नाही. त्यासाठी हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करणे आणि प्रत्येक हिंदूच्या रक्षणासाठी प्रयत्नशील रहाणे, याचा निर्धार ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या बैठकीत करण्यात आला. हा निर्धार २१ जुलैला राधाकृष्ण मंदिर येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. येणार्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्याचा निर्धारही या प्रसंगी करण्यात आला.

बत्तीस शिराळा येथील नागपंचमीमध्ये सध्या जिवंत नागाच्या पूजनावर बंदी असून ती उठवण्याच्या संदर्भात शासन पातळीवर निवेदन देणे, पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा लढा उभा करणे यांसह अन्य सूत्रांवर कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीत ‘हिंदु एकता आंदोलना’चे प्रांत उपाध्यक्ष श्री. दिलीप भिवटे, करवीर तालुका संयोजक श्री. शरद माळी, ‘हिंदु युवा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. अशोक देसाई, वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या बैठकीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, हिंदु महासभा महिला आघाडीप्रमुख शीला माने, शंकराचार्य मठाचे प्रतिनिधी श्री. शिवस्वरूप भेंडे ‘श्रीकृष्णा न्यासा’चे राष्ट्रीय सदस्य श्री. पराग फडणीस, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. विजयकुमार पाटील, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, सर्वश्री योगेश केरकर, घन:शामभाई पटेल, कैलास दीक्षित, राजू यादव, नितीन काकडे, प्रमोद सावंत, रश्मी साळोखे, अखिल भारत हिंदू महासभेचे श्री. संदीप सासने, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे तालुका संयोजक श्री. अशोक गुरव, श्री. आप्पासाहेब गुरव, हिंदुत्वनिष्ठ श्री. अशोक रामचंदानी, श्री. किरण कुलकर्णी, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र तोरस्कर, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र अहिरे यांसह अन्य उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक