केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !

 पुणे – लोहगडावरून धक्का दिल्याने पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल हत्येप्रकरणी विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती. ती मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली आहे.