घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !

२१ गुन्ह्यांची उकल

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – ठाणे गुन्हे शाखा युनिट-३ ने घरफोडी करणार्‍या सराईत आरोपीला अटक करून २१ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. राजेश राजभर (वय ३० वर्षे) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ३८ लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्यांच्या घटनास्थळांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला उत्तरप्रदेशातील आझमगड येथून कह्यात घेतले. चौकशीत त्याने ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि ठाणे ग्रामीण या भागांत घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध यापूर्वीही ३३ गुन्हे नोंद असून त्याच्याकडून २१ गुन्हे उघडकीस आले आहेत. (आरोपीला वेळीच कठोर शिक्षा झाली असती, तर आरोपीने पुन्हा गुन्हे करण्याचे धाडस केले नसते ! – संपादक) पुढील अन्वेषण गुन्हे शाखेकडून चालू आहे.