
कोल्हापूर, २६ जून (वार्ता.) – २७ जून या दिवशी तिथीनुसार असलेल्या शिवराज्याभिषेकदिनाच्या औचित्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची विशेष प्रतिकृती सिद्ध करण्यात आली. या विशेष प्रतिकृतीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि गोरक्षक यांच्या शुभहस्ते शिवतीर्थावर २६ जूनला मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते जिवाची पर्वा न करता गोरक्षणासाठी झटणारे सर्वश्री सुचित हिरेमठ, आदित्य उपले, मनोहर इंगवले, विरेश पंडित, निलेश खरबोडे, ओंकार पाटील या गोरक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, धारकरी सर्वश्री सुमेध पोवार, आशिष पाटील, निलेश पाटील, आदित्य लाड, अनिकेत देसाई, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदुत्वनिष्ठ श्री. दिलीप भिवटे यांसह अन्य उपस्थित होते.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.