महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा आरोप !
भडगाव (जिल्हा जळगाव) – खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताची खरेदी शेतकरी सरकारी कृषी केंद्रांतून करत आहेत; मात्र शेतकरी खरेदीसाठी गेल्यावर त्यांना अन्य रासायनिक खते घेण्याची सक्ती केली जात आहे आणि ते घेण्याची सिद्धता दर्शवल्यास युरिया खत दिले आहे, असा आरोप महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केला आहे.
युरियासमवेत इतर रासायनिक खते खरेदी करण्याची सक्ती होत असल्याने शेतकर्यांची आर्थिक लूट होत असल्याचा दावा करत संघटनेने चौकशीची मागणी केली आहे. शेतकर्यांना गरज नसलेली अतिरिक्त खतेही घ्यावी लागत आहेत. कृषी केंद्रांकडून होत असलेल्या कथित सक्तीमुळे शेतकर्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, असे निवेदन संघटनेने जिल्हाधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती आदींना दिले आहे.

उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !