अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !

 

 

जळगाव – २ वर्षांपूर्वी येथील एका घरातील आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेले असतांना त्यांच्या पीडित मुलीवर अत्याचार करणारा सलमान खान अख्तर खान (वय २८, रा. हमीदनगर, चोपडा) याला अमळनेर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ‘पॉक्सो’ कायद्यानुसार ५ वर्षांचा सश्रम कारावास, ५ सहस्र रुपयांचा दंड, तसेच अन्य कलमान्वये ६ महिन्यांची शिक्षा आणि ५०० रुपयांचा दंड त्याला देण्यात आला आहे.