पंढरपूर येथील श्री विठ्ठलमूर्तीस रासायनिक लेपन करण्याचे प्रकरण !

पंढरपूर – श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाला स्थगिती देण्याच्या पंढरपूर येथील मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने जिल्हा न्यायालयात दिवाणी किरकोळ अपील केले आहे. हे अपील ज्या न्यायाधिशांसमोर चालणार आहे त्या ए.एस्. सलगर यांच्या न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालाची प्रत या प्रकरणाच्या कादगपत्रांमध्ये पुरावा म्हणून जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंती प्रतिवादींच्या वतीने अधिवक्ता सुधीर रानडे यांनी केली आहे. त्यावर न्यायाधिशांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य कोणत्याही सक्षम जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याकडे विनंतीपत्र पाठवण्यात येईल, असा आदेश दिला आहे.
न्यायाधीश ए.एस्. सलगर यांनी दिलेल्या आदेशात पुढील गोष्टी नमूद केल्या आहेत. संबंधित विषयावर यापूर्वी आदेश देतांना न्यायालयाने आपले मत व्यक्त केलेले आहे, तसेच प्रतिवादींना या न्यायालयासमोर पुढील सुनावणी नको असल्याचे आवेदनातील लिखाणावरून दिसून येते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सदर अपीलाची सुनावणी स्वतःकडे चालू ठेवणे उचित ठरणार नाही. त्यामुळे हे प्रकरण अन्य कोणत्याही सक्षम जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांच्याकडे विनंतीपत्र पाठवण्यात येईल, असा आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण ?पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्व विभागाद्वारे २३ आणि २४ जून या दिवशी रासायनिक वज्रलेपन करण्यात येणार होते. या संदर्भात वारकरी संघटना, मंदिर महासंघ, पुरुषोत्तम (गणेश) लंके, बाळासाहेब डिंगरे यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात रासायनिक वज्रलेपनाच्या विरोधात दावा प्रविष्ट केला होता. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने २२ जून या दिवशी पुढील आदेश होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास स्थगिती दिली आहे. या विरोधात मंदिरे समितीने पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी किरकोळ अपील केले आहे. |
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !