
पुणे – एका खासगी प्रवासी बसमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती नर्हे (पुणे) पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवले उड्डाणपुलाजवळ बसवर कारवाई करत चालक हबास खान याच्याकडून विमल पान मसाला, व्ही १ तंबाखू, आर्.एम्.डी.पान मसाला, तुलसी तंबाखू आणि गोवा गुटखा, असा ५ लाख ९० सहस्र ८०० रुपयांचा प्रतिबंधित माल कह्यात घेतला. हा माल घेण्यासाठी आलेल्या सोहेल मुलाणी यालाही कह्यात घेण्यात आले. चौकशीअंती केदारीनगर येथील गोदामातून एकूण १७ लाख ७३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा कह्यात घेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज