
सावंतवाडी – तालुक्यातील म्हापसेकरवाडी, मळेवाड येथील शेतकरी गोविंद रघुनाथ मुळीक यांच्या मालकीच्या गायीच्या वासराचा २६ जून या दिवशी बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविषयी प्रथमेश मुळीक यांनी वन विभागाच्या कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या वेळी गुरांच्या गोठ्याच्या आजूबाजूला बिबट्याच्या पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात दिसून आले.
‘ग्रामस्थांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नये, तसेच पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत’, असे आवाहन वन विभागाने केले.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !