८६ लाख रुपयांचा साठा जप्त !

नांदेड – अन्न आणि औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नांदेड जिल्ह्यात निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय असलेली सुपारी जप्त केली. या कारवाईत २९ सहस्र ६७६ किलो सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून त्याचे मूल्य ८६ लाख ३६ सहस्र ५८६ रुपये इतके आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २२ जून या दिवशी सोलापूर-नागपूर महामार्गावरील पार्डी पथकर नाका येथे कारवाई करण्यात आली. के.ए. २९ बी ६८८० या क्रमांकाच्या या वाहनाची पडताळणी केली असता त्यामधील सुपारीचा दर्जा संशयास्पद वाटल्याने २ अन्न नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, अरुण तम्मडवार यांच्या पथकाने पार पाडली.
महापुरुषांना जातीपातींमध्ये न अडकवता त्यांच्या विचारांचे जतन करा ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : २६.०७.२०२६)
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती