
कोल्हापूर, २ फेब्रुवारी (वार्ता.) – नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केर्ली येथील धर्मप्रेमी सौ. नीलम महेश माने (काँग्रेस) आणि सौ. चंद्रभागा संभाजी मगदूम (काँग्रेस) या निवडून आल्या. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विजया वेसणेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ‘अलंकारशास्त्र’ आणि ‘गुरुकृपायोग’ हे ग्रंथ भेट दिले. या वेळी सौ. नीलम माने म्हणाल्या, ‘‘श्रीकृष्णाच्या कृपेने आम्हाला हे यश मिळाले आहे. आमच्या परीने आम्ही धर्मकार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू.’’ याप्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. विलास वेसणेकर, धर्मप्रेमी सौ. रूपाली गोरडे, कु. शोभा माने आणि श्री. महेश माने उपस्थित होते.

तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
साधकांना सूचना : सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !