कृष्णापरी हा सखा माझा ।

‘श्री. निरंजन चोडणकर याचा हात धरून साधनेत पुढे जाण्याचा आनंद श्री गुरुकृपेने आम्हाला घ्यायला मिळतो. त्याची साधनेतील साथ गुरुचरणी समर्पित होण्यासाठी सार्थकी होत आहे. गुरुदेव आणि निरंजनदादा यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

परिस्थितीचा स्वीकारकर्ता ।
संयमी मनाचा राजा ।
प्रेमभाव ठायी ठायी ।
कृष्णापरी हा सखा माझा ॥ १ ॥

गुरुभक्तीसाठी वेडा जीव ।
वेड गुरुसेवेचे तयाला ।
श्रद्धा अपार त्याची गुरूंवरी ।
व्याकुळता गुरुभेटीची जयाला ॥ २ ॥

आळवतो तो उत्कंठेतून ।
त्या प्राणप्रिय गुरुचरणांना ॥ ३ ॥

असा सखा दिला मजला ।
जणू परीस स्पर्श झाला ।
पदोपदी शिकण्या घडण्याला ।
गुरूंनी हा आदर्श मला दिला ॥ ४ ॥

सच्चा तो गुरूंचा प्यारा ।
गुरुप्रीतीने न्हाला ।
आनंदाने बहरला ।
बेभान होऊन गुरुचरणी ।
तो समर्पित जाहला ॥ ५ ॥

– श्री. सुमित सागवेकर आणि श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.


सतत गुरुचरणांचा ध्यास असणारे श्री. निरंजन चोडणकर !

भावभक्तीच नव्हे, तर लढाऊ वृत्तीही जागृत असे ।
चोवीस तास ज्याचा गुरुचरणांचा ध्यास असे ॥ १ ॥

केवळ साधकांचीच नव्हे ।
तर समाजातील लोकांचीही प्रगती व्हावी, ही तळमळ असे ॥ २ ॥

बोलणे सतत प्रेमळ आणि निरागस ही असे ।
गुर्वाज्ञा हेच त्यांचे जीवन असे ।
ध्यास केवळ हिंदु राष्ट्राचा असे ॥ ३ ॥

अशा गुरुबंधूचा सहवास लाभला आम्हा सर्वांना ।
हीच प्रार्थना असे, लवकरात लवकर दादा गुरुचरणी एकरूप होऊ दे ॥ ४ ॥

– कु. कनकमहालक्ष्मी देवकर, भाग्यनगर (२३.१.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक