देहली येथे ‘लिटील चॅम्प स्कूल’ शाळेत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

देहली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘लिटील चॅम्प स्कूल’ या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ. मंजुला कपूर म्हणाल्या, ‘‘आज टी-शर्ट, साडी, मास्क, केक आदी वस्तूंवर राष्ट्र्रध्वजाचा वापर केला जातो. त्यामुळे राष्ट्रध्वजासह आपल्या देशाचाही अवमान होतो. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही, याची काळजी घ्या.’’ सौ. कपूर यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी विद्यार्थ्यांनी ‘आम्ही असे करणार नाही आणि इतरांचेही प्रबोधन करणार’, असे सांगितले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शम्पा घोष चौधरी आणि शिक्षिका साधना शुक्ला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांसाठी नियमित बालसंस्कारवर्ग चालू करण्याची इच्छा प्रदर्शित केली.