मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथे रणरागिणी समितीची स्थापना !

निळे येथील जोतिबा मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी समितीची शाखा स्थापन करण्यात आली. यात निळे आणि बाणेकरवाडी येथील धर्मशिक्षण वर्गांतील युवती अन् महिला यांचा पुढाकार होता. ग्रामदैवत जोतिबा देवाच्या चरणी श्रीफळ वाढवून प्रार्थना करण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ दूरवरच्या साधकांनाच नव्हे, तर समाजालाही कार्यात सहभागी होता येणे !

मागे वळून पाहिले, तर प्रभात फेरी काढायला शिकवणे, नामदिंडी काढणे, समाजाला एकत्र करायला शिकवणे, जाहीर सभा घेणे, प्रवचनांतून समाजात जाऊन भूमिका मांडायला शिकवणे, हे सर्व प.पू. डॉक्टरांनी समाजात जाऊन प्रवचने घ्यायला सांगून बोलायला शिकवणे, दैनिक, तसेच साप्ताहिकाच्या माध्यमातून विचार मांडून काही प्रशिक्षण यांद्वारे करून घेतले.’

राष्ट्र-धर्मासमोरील आव्हानांसाठी रामराज्य हवे ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.’ आस्थापनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन !

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

या उत्सवामधून हिंदूंचे प्रभावी संघटन आणि समाजामध्ये जागृती होण्याकरता उत्सवात होणारे अपप्रकार दूर करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण देऊन हिंदु बांधवांमध्ये जागृती करणारी हिंदु जनजागृती समिती याच उद्देशाने संघटनासाठी प्रयत्नशील आहे.

संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन काळाची आवश्यकता ! – राजूमामा भोळे, आमदार, जळगाव

‘वन्दे मातरम्’मध्ये आपल्याला दैनंदिन जीवनासाठी लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंविषयी (हवा, अन्न, पाणी) विवेचन आहे. या सर्व गोष्टींचा वापर या लोकांकडून केला जातो, तरी यास विरोध करण्याची काय आवश्यकता ?, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.

९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे ! – ‘सुराज्य अभियाना’ची राज्यपालांकडे मागणी

१९ ऑगस्ट या दिवशी संस्कृतदिन आहे. यंदाच्या वर्षी तरी संस्कृत दिनाला संस्कृत पुरस्कारांचे वर्ष २०१५ पासूनचे रखडलेले अनुदान दिले जावे, तसेच २०२१ पासून रखडलेले पुरस्कार किमान घोषित तरी करावेत, अशी मागणी सुराज्य अभियानाचे महाराष्ट्र समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद आणि हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन !

उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन दबावगट सिद्ध करावा ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

या बैठकीला पुणे, पिंपरी-चिंचवड, मंचर, तळेगाव, भोर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी एक होऊन कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.

आपल्या देशासमोर असलेल्या विविध संकटांवर असलेला एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्र ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

या वेळी त्यांनी ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचा आणि जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असे उपस्थितांनी सांगितले.

बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

यासह महाराष्ट्र राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरात लवकर पारित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले.