पुणे येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘संकल्प रामबाग विकास महिला मंडळा’च्या वतीने आयोजित व्याख्यान !
पुणे, १४ ऑगस्ट (वार्ता.) – वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाला हिंदु राष्ट्र घोषित न करता ‘निधर्मी राष्ट्र’ घोषित करण्यात आले. हिंदूंना धर्म शिकवण्याची कोणतीच योजना नव्हती, त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले नाही. हिंदूंमध्ये धर्माभिमान उरला नाही, तसेच धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित होण्याची मानसिकताही उरली नाही.
सध्या आपल्या देशासमोर विविध प्रकारची संकटे आहेत, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले.
१२ ऑगस्ट या दिवशी बेडेकर गणेश मंदिर येथील सभागृहात ‘संकल्प रामबाग विकास महिला मंडळा’च्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी त्यांनी ‘राष्ट्रासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.
वैशिष्ट्यपूर्ण या वेळी उपस्थितांनी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ अभ्यासासाठी विकत घेतला, तसेच ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान देण्याचा आणि जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू’, असे उपस्थितांनी सांगितले. |