पुणे येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीची पहिली बैठक पार पडली !
पुणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन एक दबावगट सिद्ध करणे. राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांवर नियमित काहीतरी कृती करणे, तसेच १५ ऑगस्ट, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे राष्ट्रीय आणि धार्मिक सण योग्यरितीने साजरे करण्यासाठी प्रबोधन करणे, ही भावी काळाची आवश्यकता आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी व्यक्त केले.
पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपति मंदिराच्या सभागृहामध्ये हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या बैठकीला प्रत्यक्ष आणि ऑनलाईनच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
सर्वांनी एकत्र येऊन कृती करण्याचा निर्धार !
या बैठकीला पुणे, पिंपरी-चिंचवड, मंचर, तळेगाव, भोर अशा विविध ठिकाणांहून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी एक होऊन कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. एक समान कृती कार्यक्रमातून कृती करूया, असेही ठरवण्यात आले. यामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा प्रत्यक्ष आणि एकदा ऑनलाईन बैठक घेणे, चालू घडामोडींचा अभ्यास करून कृती कार्यक्रम आखणे, प्रबोधनात्मक कृती करणे असे उपस्थित सर्वांनी ठरवले.