ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील छपियाना गावात बिर्याणीचे दुकान चालवणारे हिंदु दुकानदार कुलदीप सैनी यांच्याकडे नोकर म्हणून काम करणार्या दानिश याने सैनी यांच्या पत्नीला पळवून नेले. ही घटना ११ एप्रिल या दिवशी घडली. त्यानंतर १५ एप्रिल या दिवशी दानिश मालकाच्या पत्नीला सोडण्यासाठी आला. त्या वेळी कुलदीप सैनी आणि त्यांचे वडील यांनी दानिश याला चोपले. त्यानंतर त्याला उपचारांसाठी देहलीतील सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले. दानिश याच्या कुटुंबियांनी सैनी आणि त्यांचे वडील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कुलदीप सैनी यांना कह्यात घेतले. (दंगली किंवा अन्य प्रकरणांत हिंदूंनी मुसलमानांच्या विरोधात तक्रार केल्यावर त्यावर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस मुसलमानांनी तक्रार केल्यावर मात्र त्याची तात्काळ नोंद घेतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) पोलिसांचे म्हणणे आहे की, ती महिला स्वतःच्या इच्छेने दानिशसमवेत पळून गेली होती. सैनी यांच्या दुकानावर दानिश गेल्या ४ महिन्यांपासून नोकर म्हणून काम करत होता.
संपादकीय भूमिकाया घटनेवरून ‘अशांना कामावर ठेवायचे का ?’, असा प्रश्न व्यापार्यांच्या मनात निर्माण झाल्यास चुकीचे काय ? |