१. धर्मांधांच्या आव्हानामागील भीषण सत्य !
‘तुमचा राम आता तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ? त्याला तुम्ही बोलवा !’… अशा आरोळ्यांनी मध्यरात्री महू (मध्यप्रदेश) येथे आकांडतांडव करण्यात आले. निमित्त होते भारताने ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ या क्रिकेटच्या स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केल्यानंतर हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीचे… !
घटनाक्रमाविषयी मतेमतांतरे असतील; परंतु सर्वांत महत्त्वाचे गोष्ट आहे, ती हिंदूंना दिल्या गेलेल्या आव्हानाची. ते आव्हान वरील भाषेत हिंदूंना दिले गेले आहे. हे आव्हान आता केवळ महू शहरातील हिंदूंपुरते मर्यादित आहे, असे जर कुणी म्हणत असेल, तर त्याच्या मतीभ्रष्टतेला काही म्हणण्यास शब्दच नाहीत, हे निश्चित !
ही स्थिती अत्यंत बिकट आहे. आज जागोजागी देशभरात हिंदूंच्या निघणार्या मिरवणुका, मग त्या लग्नसमारंभाच्या असोत वा धार्मिक उत्सवांच्या वा देवतांच्या मूर्तीविसर्जनाच्या. प्रत्येक मिरवणुकीसमवेत दुसर्या दिवशी वृत्तपत्रांत हा मथळा जोडलेलाच असतो, ‘अमुक एका प्रार्थनास्थळापाशी मिरवणूक आल्यावर दगडफेक, आक्रमण…इत्यादी.’

२. हिंदूंनो, धर्मांधांनी दिलेल्या आव्हानाचा विचार करा !
गेली ३० वर्षे सनातन संस्था ‘हिंदूंनो, साधना करा’; म्हणून प्रतिदिन कंठशोष करत आहे. का ? साधना करणार्याला, म्हणजे आपल्या भक्ताला ईश्वर, म्हणजे राम, कृष्ण, कालीमाता इत्यादी देवाचे कोणतेही रूप घ्या, ते साहाय्य करते. ‘न मे भक्तः प्रणःश्यति ।’
असे त्याचे वचन आहे. त्यामुळे ‘हिंदूंनो, साधना करा, भक्त बना’, असे गावोगावी जाऊन सनातनचे साधक लोकांना सांगत आहेत. वरील आव्हानाचा विचार करता त्यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी दिसून येते. आज अन्य पंथांनुसार साधना करणार्यांचे प्रमाण हिंदु धर्मानुसार साधना करणार्यांच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. हिंदूंमधील १० टक्के हिंदूही साधना करणारे नाहीत. ‘केवळ ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देऊन देव साहाय्य करत नाही. त्यासाठी त्याचे भक्त व्हावे लागते.’
३. हिंदूंच्या श्रद्धेची कसोटी घेणारे आव्हान !
धर्म-अधर्माच्या लढ्यामध्ये आपले स्वतःचे टिकवायचे असेल, तर साधना करण्याला पर्याय नाही. आज धर्मांधांनी दिलेल्या या आव्हानाला हिंदू कसे प्रत्युत्तर देणार आहेत ? आधीच पुरोगामी, निधर्मीवादी यांच्यामुळे बुद्धीभेद झालेला हिंदु समाज कशाच्या बळावर धर्मांधांचा सामना करणार आहे ? काळ किती भयंकर आहे बघा ! देशाच्या फाळणीपूर्वी, म्हणजे वर्ष १९४६ मध्ये धर्मांधांनी ‘प्रत्यक्ष कृती दिना’ची (डायरेक्ट ॲक्शन डे) घोषणा करून निरपराध हिंदूंची कत्तल केली. लाखो आयाभगिनींची अब्रू वेशीवर टांगली. आजची स्थितीही काही निराळी नाही. आज तर ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटामुळे संपूर्ण पिढीच भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशात असे आव्हान ‘हिंदूंना त्यांची श्रद्धा किती दृढ आहे ?’, याची परीक्षा घेणारे ठरणार हे निश्चित !
४. धर्मांधांच्या उद्दामपणाला उत्तर उन्माद किंवा भावना नसून साधना हे आहे !
भलेही ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात २५ कोटी पाकिस्तान्यांनी त्यांच्या पंतप्रधानांसह प्रार्थना करूनही देव त्यांच्या साहाय्याला आणि भारताविरुद्ध विजय मिळवून देण्यासाठी आला नसेल; मात्र भारताविरुद्धचा प्रत्येक पराभव धर्मांधांच्या जिव्हारी लागतो अन् ते भारतामध्ये राहून देशाच्या विरोधातच कारवाया करत आहेत. हिंदूंना संपवण्यासाठी आणि इस्लामीस्तानची स्थापना करण्यासाठी ते संधीच्या शोधात आहेत. त्यासाठी ते हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करत आहेत. त्यांना साथ द्यायला काँग्रेसी पिलावळ उभी आहेच. शासनकर्तेही धर्मांधांच्या उद्दामपणाविरुद्ध काही कारवाई करतांना दिसत नाहीत. त्यामुळे अशांना तोंड द्यायचे, तर साधनाच केली पाहिजे. भगवंताला शरण जाऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आत्मबल प्राप्त केले पाहिजे. ते उन्मादामुळे मिळू शकत नाही. भावनेपोटी मिळू शकत नाही. त्यासाठी भगवंताचे भक्त बनले पाहिजे आणि त्यासाठी साधना केली पाहिजे.
‘राम तुमच्या साहाय्याला का येत नाही ?’, असे विचारणार्यांनो, या प्रश्नाचे उत्तर द्या !
‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये झालेल्या सामन्याच्या वेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पाकिस्तानातील २५ कोटी मुसलमान जनतेने (त्यांच्या पंतप्रधानांसह) पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना केली; परंतु पाकिस्तान भारतावर विजय का मिळवू शकला नाही ? (१२.३.२०२५)
५. राम आहे आणि तो साहाय्याला येईल; मात्र त्यासाठी…!
म्हणून हिंदूंनो, आतापासूनच भगवंताचे भक्त होण्यासाठी प्रयत्न करा, तरच धर्मांधतेच्या उन्मादापासून तुमचे पर्यायाने भारताचे रक्षण होईल. राम आहे आणि निश्चितपणे तो तुमच्या साहाय्याला येणार आहे; परंतु हनुमंतासारखी, भक्त प्रल्हादासारखी भक्ती करणे नितांत आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कृतीतून धर्मांधांना उत्तर द्यावे लागणार आहे, नव्हे संपूर्ण जगाला आणि काळाला उत्तर द्यावे लागणार आहे. ‘साधना करणे अनिवार्य आहे’, हे लक्षात घ्या ! काळाच्या ओघात तुमचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही.’ भगवंताच्या इच्छेविना झाडाचे पानही हलू शकत नाही; परंतु भगवंताला भक्ताची इच्छा मोडवत नाही, हेही तितकेच खरे; म्हणून भगवंताचे, रामाचे, कृष्णाचे भक्त व्हा ! तोच तुमचा रक्षणकर्ता आहे.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२५)