गोवा : क्रांतीलढ्याचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांत क्रांतीलढ्याचा इतिहास, कुंकळ्ळीवासियांचा लढा, इन्क्विझिशनचा भयानक इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत न होणे दुर्दैवी ! स्वातंत्र्यसेनानी टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास’ झाल्याचे म्हटले, ते योग्यच होते !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाविषयी पणजी (गोवा) येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

पणजी येथे १४ जून या दिवशी वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी गोव्‍यातील हिंदूंना भेडसावणार्‍या विषयाचे जिज्ञासूपणे प्रश्‍न विचारून त्‍यावर हिंदु जनजागृती समितीची भूमिका जाणून घेतली.

काशी विश्‍वेश्‍वराची मुक्‍ती होईल, तेव्‍हा देश अखंड हिंदु राष्‍ट्र होईल ! – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात पार पडलेले ‘मंदिरमुक्‍ती अभियान’ सत्र

उत्तर-पूर्व भारतात हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्यक ! – अधिवक्ता राजीव नाथ, जिल्हाध्यक्ष, हिंदु जागरण मंच, कछार, आसाम

केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे…

समलैंगिकतेला मान्यता दिल्यास भारतातील अनेक कायद्यांवर दुष्परिणाम होईल ! – अधिवक्ता मकरंद आडकर, अध्यक्ष, महाराष्ट्र शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था, नवी देहली

सर्वाेच्च न्यायालयात समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी १५ याचिका प्रविष्ट झाल्या आहेत. या याचिकांमध्ये हिंदु विवाह कायदा रहित करणे, २ पुरुष किंवा २ स्त्रिया यांनी एकमेकांशी केलेले समलिंगी विवाह कायदेशीर करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच गोहत्या संपूर्णपणे थांबतील !  – अधिवक्त्या सिद्ध विद्या, उच्च न्यायालय, मुंबई

भारतात विविध राज्यांमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदे बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ती हिंदूंशी एकप्रकारे केलेली प्रतारणा आहे. एका राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा असतांना त्याच्या शेजारच्या राज्यात गोहत्याबंदी कायदा नसेल, तर व्यापारी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन गोहत्या करतात.

प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून साधना करावी ! – पू. प्रदीप खेमका, धर्मप्रचारक, सनातन संस्था (झारखंड)

कोरोनाच्या काळात माझा व्यवसाय व्यवस्थित चालत होता. माझ्या कोणत्याही कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली नाही. अशा विविध प्रसंगांत मी साधनेमध्ये खरोखर शक्ती असल्याचे अनुभवले. साधनेचे बळ अतिशय प्रभावी आहे.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्ये मतदान करू ! – अजित सिंह बग्गा, राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष, व्यापार मंडल आणि अध्यक्ष, वाराणसी व्यापार मंडल

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्म्य पत्करूनही पुनर्स्थापित केल्याविना आम्ही रहाणार नाही.

नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ?

‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.