‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण !

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ तृतीय दिवस

डॉ. अमित थडानी यांच्या ‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाचे लोकार्पण

विद्याधीराज सभागृह, १८ जून (वार्ता.) – मागील काही वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील झालेल्या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपाखाली फसवून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. हे षड्यंत्र उघड करणारे ‘द रेशनलिस्ट मर्डर्स’ हे डॉ. अमित थडानी लिखित पुस्तकाचे प्रकाशन वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात करण्यात आले.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते. अमित थडानी हे मुंबई येथे रहाणारे असून सुप्रसिद्ध शल्यचिकिस्तक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या खटल्यांतील १० सहस्र पानांची आरोपपत्रे, न्यायालयीन निर्णय, सरकारी कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास करून डॉ. अमित थडानी यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे.