रामनाथ देवस्थान – केवळ श्रीराममंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदूंना ६० वर्षे संघर्ष करावा लागला. देशात हिंदूंचे असे अनेक प्रश्न आहेत. ते प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर मार्गाने लढत बसलो, तर अनेक वर्षे लागतील. त्यामुळे सर्व प्रश्नांवर उपाय मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच उपाय आहे, असे उद्गार कछार (आसाम) येथील ‘हिंदु जागरण मंचा’चे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता राजीव नाथ यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवच्या तृतीय दिनी (१८.३.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
अधिवक्ता राजीव नाथ पुढे म्हणाले, ‘‘आसाममध्ये ब्रिटिशांच्या काळापासून ख्रिस्ती पंथियांचे प्रमाण अधिक आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांची संख्या वाढली, तेथे देश विभागला गेला आहे. आसाममध्ये मुसलमान लोकसंख्याही ३६ टक्क्यांहून अधिक आहे. तसेच ९ जिल्हे मुसलमानबहुल बनले आहेत. त्यामुळे आसामकडे लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ आसामच नाही, तर संपूर्ण उत्तर-पूर्व भारतामध्ये हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आसाममध्ये धर्मांधांकडून सुनियोजितपणे ‘लव्ह जिहाद’ राबवला जातो. त्यांच्याकडून १८ वर्षांवरील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येते. त्यासाठी ते वशीकरणाचाही वापर करतात. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ मध्ये अडकलेल्या मुलींना सोडवण्यासाठी बुद्धीकौशल्यासमवेत आध्यात्मिक स्वरूपाच्या नामजपासारख्या उपायांचाही पुष्कळ लाभ होतो. आसाममध्ये ‘लॅण्ड जिहाद’चीही मोठी समस्या आहे; पण तेथे आता हिंदुत्वनिष्ठ सरकार असल्यामुळे हा प्रश्न सुटण्यासाठी साहाय्य होत आहे.’’