इयत्ता १० वी आणि १२ वी ची परीक्षा ‘ऑफलाईन’ होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या अंतर्गत त्यांचा गृहपाठ सादर करायचा आहे. कोरोनामुळे यामध्ये काही अडचण आल्यास त्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल.

१२ वर्षीय मुलाने केला ६ वर्षांच्या बहिणीवर बलात्कार !

आपले पाल्य भ्रमणभाषवर काय पहात आहे, हे पहाणे पालकांचे दायित्व असतांना त्यांनी लक्ष न ठेवल्यानेच ही घटना घडली, असेच म्हणावे लागेल !

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सिद्ध केलेल्या प्रश्‍नसंचात अभ्यासाबाहेरील प्रश्‍न !

परीक्षेची सिद्धता करतांना विद्यार्थ्यांना ताण येऊ नये म्हणून राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍नसंच सिद्ध करण्याचे दायित्व परिषदेला दिले होते; पण यातील प्रश्‍न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्याने परीक्षेसाठी नेमका अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडला आहे.

बजरंग दलाने नाटकाच्या शीर्षकातील ‘साधू’ शब्दाला आक्षेप घेतल्याने आयोजकांनी नाट्यमहोत्सव रहित केला !

आतापर्यंत उघडले स्वर्गाचे दार, आम्ही पाचपुते यांसारख्या अनेक नाटकांतून केवळ देवता, साधू, संतच नव्हे, तर राष्ट्रपुरुषांचाही अनेक वेळा अवमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याची ही पद्धत अद्यापही चालूच आहे !

राज्यातील बहुतांश विनाअनुदानित महाविद्यालये ‘नॅक’ मूल्यांकन करण्यास अनुत्सुक !

विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठीच बड्या व्यक्ती शिक्षण संस्था चालवण्याचा घाट घालत आहेत.

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमा !

शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन गोवा राज्य महिला आयोगाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना केली आहे.

मानसिक तणावातून पोलिसांच्या वाढत्या आत्महत्या !

कामाचा ताण, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याकडून छळवणूक, आरोग्यविषयक समस्या किंवा मानसिक तणाव आदींमुळे टोकाची भूमिका घेऊन गोव्यात काही पोलीस कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मराठी शाळेत शिक्षण घेतल्याने मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या १५९ तरुण-तरुणींचे आंदोलन

राज्यभर ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला; पण मराठीबहुल महाराष्ट्रात अशी घटना घडणे लज्जास्पद !

हास्यास्पद पाश्‍चात्त्य शिक्षणप्रणाली !

‘पाश्‍चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय, मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती अंगी बाणवून ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प जोपासावा, असे मार्गदर्शन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.