(म्हणे) ‘जुने गोवे येथे चर्चच्या ठिकाणी मंदिर होते’, असे सांगून काही हिंदू ‘गाईड’ पर्यटकांची दिशाभूल करतात !’ – मिकी पाशेको

जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?

‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा !

गोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी त्यांची मते गोमंतकियांवर लादू नयेत !

(म्हणे) ‘सेंट फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ नव्हे’ म्हणणारे सुभाष वेलिंगकर ढोंगी !’ – चर्चिल आलेमाव

गोमंतकीय हिंदूंच्या पूर्वजांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी काहीही न वाटणारे गोव्यातील धर्मांतरित ख्रिस्ती प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करतात, यात नवल नाही !

(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !

सीबीएस्ईने अभ्यासक्रमातून इस्लामी साम्राज्य, शीतयुद्ध आदींवरील धडे वगळले !

त्याचसमवेत हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे धडे देऊन वास्तविक इतिहास समोर ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे !

जोतिबा डोंगर येथील प्राचीन विहिरीची ‘शिवशक्ती प्रतिष्ठान’च्या वतीने स्वच्छता !

पुढील मोहिमेत विहिरीतील गाळ काढून विहीर स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी साठवणूक होईल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

ज्ञानवापी मशिदीजवळील देवी श्रृंगार गौरीमातेची वर्षभर पूजा करण्याची अनुमती

ही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्‍चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली.

मृत्यूनंतर छत्रपती शंभूराजांचे डोके भाल्यावर टोचून फिरवण्यात येणे आणि नववर्षाची गुढी उभारणे या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध नाही !

महाराष्ट्रात काही महाभागांनी ‘गुढ्या उभारणे, हा शंभूराजांचा अपमान आहे’, असे सांगत कित्येकांना गुढ्या उभारू दिल्या नाहीत. उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या. विचारस्वातंत्र्य आणि पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्‍या महाराष्ट्रात असे घडणे,  हे चिंताजनक आहे.

काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न ! मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

गडकिल्ल्यांवरील मद्यपान आणि अस्वच्छता यांच्या विरोधातील ‘पोस्ट’मध्ये इतिहासाचा विपर्यास !

या पोस्टमध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या यांना अफझलखान आणि शाहिस्तेखान यांच्या रूपात प्रतिकात्मक दाखवून ‘स्वराज्याचा खरा शत्रू अफझलखान नव्हे; तर प्लास्टिकची घाण’, ‘स्वराज्याचा खरा शत्रू शाहिस्तेखान नव्हे; तर दारुड्यांची घाण’, असे लिहिण्यात आले आहे.