फ्रान्सिस झेवियरवरील प्रा. वेलिंगकर यांच्या वक्तव्यावरून माजी आमदार चर्चिल आलेमाव आणि मिकी पाशेको यांचा थयथयाट !
पणजी, २९ एप्रिल (वार्ता.) – ‘सेंट फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब(साहेब)’ नव्हे’, असे म्हणणारे प्रा. सुभाष वेलिंगकर हे ढोंगी आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार आणि नुकतेच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केली आहे. २८ एप्रिलला हिंदु रक्षा महाआघाडीने ३ मे २०२२ या दिवशी ‘गोव्यातील हिंदू आणि ख्रिस्ती यांच्या पूर्वजांवरील अत्याचारांची माहिती देणार्या ‘गोवा फाइल्स’ खुल्या करणार’, असे एका पत्रकार परिषदेद्वारे घोषित केले होते. त्यात प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी जेजुईट पाद्री फ्रान्सिस झेवियर हा ‘गोंयचो सायब’ नसून गोमंतभूमीची निर्मिती करणारे भगवान परशुराम हे खरे ‘गोंयचो सायब’ आहेत’, असे विधान केले होते.
याविषयी एका पत्रकाराने चर्चिल आलेमाव यांचे मत विचारताच ते म्हणाले,
१. या ढोंगी प्रा. सुभाष वेलिंगकर यांना ‘जगातील काय माहिती आहे ?’, असे मी विचारू इच्छितो. सेंट फ्रान्सिस झेवियर गोव्यात आले, तेव्हा गोव्यात सर्वत्र जंगल होते. कितीतरी लोकांना साप वगैरे चावायचे. त्या लोकांना त्यांनी बरे केले. त्यांचे निधन होण्यापूर्वी त्यांनी ‘आपला मृतदेह गोव्यात न्यावा’, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे ते ‘गोंयचो सायब’ आहेत यात शंकाच नाही. (ख्रिस्ती धर्माचा प्रसार गोव्यात करणे सुलभ व्हावे; म्हणून ‘धर्मसमीक्षण सभा’ (इन्क्विझिशन) गोव्यात स्थापन करण्याविषयी फ्रान्सिस झेवियर यांनी १६ मे १५४६ या दिवशी पोर्तुगालच्या राजाला पत्र लिहिले. त्यानंतर जगाच्या इतिहासात गोव्यातील लोकांवर इन्क्विझिशनच्या नावाखाली जेवढे अत्याचार झाले, तेवढे अत्याचार जगामध्ये कुठेच झाले नाहीत. प्रा. सुभाष वेलिंगकर यांना ‘जगातील काय माहिती आहे ?’, असा प्रश्न विचारणार्या चर्चिल आलेमाव यांना हा इतिहास ठाऊक आहे का ? नसेल तर त्यांनी पोर्तुगालला जाऊन या संदर्भातील नोंदी पहाव्यात ! – संपादक)
२. या गोव्यातील मातीवर अनेक सरकारे येऊन गेली. जे सरकार येते, त्याचा मुख्यमंत्री नेहमी ३ डिसेंबरला सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्ताला (जत्रेला) जातो. (राजकारणी मते मिळवण्यासाठी असले प्रकार करतात, हे सर्वांना ठाऊक आहे ! खरेतर गोमंतकियांवर ‘इन्क्विझिशन’ लादून त्यांची नृशंस हत्या केल्याबद्दल पोर्तुगाल सरकारने गोमंतकियांची क्षमा मागायला हवी ! – संपादक)
३. मनोहर पर्रीकर नेहमीच या फेस्ताला जात होते. आता असलेले मुख्यमंत्रीही नेहमीच जातात. या ढोंगी (प्रा.) सुभाष वेलिंगकर यांची मनस्थिती बरोबर नाही; म्हणून मी सांगतो त्यांना जर गोव्यातील ‘गोंयचो सायब’ यांचे वर्चस्व मान्य नसेल, तर त्यांनी गोवा सोडून जावे. (प्रा. सुभाष वेलिंगकर यांना असे सांगणारे चर्चिल आलेमाव स्वतःच पोर्तुगालला का जात नाहीत ? तेथे त्यांनी हवे तेवढे फ्रान्सिस झेवियरचे गुणगान गावे ! – संपादक)
४. सुभाष वेलिंगकर गोव्यातील एकात्मता नष्ट करू पहात आहेत. ही संधी आम्ही तुम्हाला देणार नाही. (२-३ वर्षांपूर्वी एका जल्मी नावाच्या पुरो(अधो)गाम्याने बाणावली येथे चर्चिल आलेमाव यांच्या उपस्थितीत भगवान परशुराम या हिंदूंच्या श्रद्धास्थानाविषयी अपशब्द उच्चारले होते. त्या वेळी चर्चिल यांना ‘गोव्यातील एकात्मता नष्ट होणार’, असे वाटले नाही का ? – संपादक)
५. जगातील कोणत्याही धर्माचे, कोणत्याही जातीचे लोक गोंयच्या सायबाच्या फेस्ताला (जत्रेला) येतात. (गोव्यात विदेशी ख्रिस्ती पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी या फेस्ताला पर्यटन खाते आणि शासनाने मोठे करून ठेवले आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकागोव्याचा सत्य इतिहास सांगणारे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या पाठीशी हिंदूंनी एकजुटीने आणि खंबीरपणे उभे रहावे ! |
मिकी पाशेको यांच्याकडून प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार
काँग्रेसचे माजी आमदार मिकी पाशेको यांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, ‘प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी २८ एप्रिल २०२२ या दिवशी हिंदु रक्षा महाआघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत समाजात तेढ निर्माण करणारी विधाने केली आहेत.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात केलेली तक्रार –
गोव्यातील लोक ज्यांना संत मानतात ते ‘सेंट फ्रान्सिस झेवियर म्हणजे ‘गोंयचो सायब’ हे गोंयचो सायब नसून भगवान परशुराम हे गोंयचो सायब आहेत’, असे विधान केले आहे. पोतुगीज अधिकार्यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांना ‘गोंयचो सायब’ नाव दिले, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्यातील जातीय एकात्मता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी हे विष ओकले आहे. त्यांनी घटनेच्या कलम १५३ ए, १५३ बी आणि भारतीय दंड संहितेचे कलम २९५ आणि ५०५ अन्वये गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. सुभाष वेलिंगकर हे राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक आहेत. ते जातीय शत्रुत्व आणि समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सुभाष वेलिंगकर आणि त्यांच्या समवेत असणार्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी.’’
वॉरन आलेमाव यांच्याकडून निषेध, तर मायकल लोबो यांची कारवाईची मागणी !
‘हिंदु रक्षा महाआघाडी’चे प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या ‘जेजुईट पाद्री फ्रान्सिस झेवियर हा कदापि, (पोर्तुगीज गुलामगिरीतून मुक्त झालेल्या गोव्याचा) ‘गोंयचो सायब’ होऊ शकत नाही’ या विधानाचा वार्का येथील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी निषेध केला आहे. वॉरन पुढे म्हणतात, ‘‘फ्रान्सिस झेवियर हा आमचा जेजुईट पाद्री आहे आणि त्यांच्या विरोधात कुणीही अपशब्द काढल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. (इन्क्विझिशनद्वारे हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यास पोर्तुगीज शासनाला पत्र लिहिणार्या व्यक्तीविषयी हिंदूंना आदर का असावा ? – संपादक) प्रा. वेलिंगकर यांच्या या विधानामुळे आम्ही दुखावलो आहोत आणि प्रा. वेलिंगकर यांच्यासारख्या कट्टरवादी लोकांच्या वक्यव्यांची आम्हाला भीती वाटू लागली आहे. गोव्यात सर्व धर्मियांमध्ये धार्मिक सलोखा टिकून आहे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रा. वेलिंगकर यांच्यासारख्या व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे. (अभिव्यक्तीस्वातंत्र्यवाले याविषयी वॉरन आलेमाव यांना समजावतील का ? – संपादक)
(म्हणे) ‘गोव्यातील शांती आणि धार्मिक सलोखा बिघडवणार्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी !’ – मायकल लोबो, विरोधी पक्षनेते
गोव्यात सर्वधर्मियांमध्ये धार्मिक सलोखा आहे. जेजुईट पाद्री फ्रान्सिस झेवियर याला गोव्यातील, शेजारील आणि जगभरातील सर्वधर्मीय लोक ‘गोंयचो सायब’ मानतात. (याचे कारण त्यांना इन्क्विझिशनद्वारे गोव्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले होते आणि या इन्क्विझिशनची मागणी फ्रान्सिस झेवियर याने केली होती, हे ठाऊक नाही ! – संपादक ) कोणत्याही स्वरूपाच्या जागृती अभियानामुळे गोव्यातील शांती भंग होऊ शकत नाही. गोव्यात शांती आणि धार्मिक सलोखा बिघडवणार्यांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली आहे.
संपादकीय भूमिका
|