‘इंस्टाग्राम’वर देवतांचे विडंबन करणारी बनावट खाती आणि चालक यांवर कारवाई करा ! – अधिवक्ता महेश धांडे
महापुरुष आणि देवता यांचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सक्षम कायदा शासनकर्ते केव्हा करणार आहेत ?
महापुरुष आणि देवता यांचा अवमान करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सक्षम कायदा शासनकर्ते केव्हा करणार आहेत ?
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर शिवप्रेमींनी गोवाभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाची सांगता फर्मागुडी, फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महादुग्ध-जलाभिषेक करून होणार आहे.
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेच्या सदस्यांनी पोलिसांची भेट घेतल्यानंतर असे आवाहन केले.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या भंजनाचा कुणी विचारही करू शकणार नाही, असे संघटन गोमंतकातील हिंदूंनी उभे करायला हवे !
धर्मशिक्षणाअभावी समाजाचे होत असलेले नैतिक अधःपतन ! महिलांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
‘सनक’ या गाण्याद्वारे भगवान शंकराचा अवमान केल्याच्या प्रकरणी रॅप गायक बादशाह याने क्षमा मागितली आहे. त्याने ‘या गाण्यात पालट करून ते पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल’, असे म्हटले आहे.
या नाटकाच्या संहितेवरच बंदी घालण्याची शिवप्रेमींनी मागणी करावी. यामुळे हे नाटक कुठेच सादर केले जाणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ते बंद पाडण्याचीही आवश्यकता रहाणार नाही !
येथे लेनिन, कार्ल मार्क्स आणि स्टॅलिन या तिघांचे पुतळे होते; परंतु समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. आव्हाड यांनी केलेल्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतल्या जात आहेत.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी हिंदूंचे आदर्श पुरुष आणि ग्रंथ यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका करणार असतील, तर केंद्र सरकारनेही कठोर भूमिका घेत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, म्हणजे परत कुणी अशी वक्तव्ये करण्याचे धाडस करणार नाही.