दार्जलिंगमधील लेनिनच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

कार्ल मार्क्स, स्टॅलिन आणि लेनिन

दार्जलिंग (बंगाल) – येथे असलेल्या रशियाचा कम्युनिस्ट नेता व्लादिमिर लेनिन याच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे. गेल्या ५६ वर्षांपासून हा पुतळा नक्सलबाडी येथील बेंगाजात येथे अस्तित्वात होता.

समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली

‘येथे लेनिन, कार्ल मार्क्स आणि स्टॅलिन या तिघांचे पुतळे होते; परंतु समजाकंटकांनी केवळ लेनिन याच्याच पुतळ्याची तोडफोड केली. ‘या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी मार्क्सवादी आणि लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य पूर्णा सिंह यांनी केली.