गोवा गुटख्‍याच्‍या मालकासह दाऊदच्‍या ३ साथीदारांना १० वर्षांचा कारावास !

दाऊदला साहाय्‍य केल्‍याच्‍या आरोपाचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गुटखा किंग जे.एम्. जोशी यांच्‍या साहाय्‍याने दाऊदने पाकिस्‍तानातील कराची येथे गुटखा आस्‍थापन स्‍थापन केले. गोवा गुटख्‍याचे मालक जे.एम्. जोशी आणि कुख्‍यात डॉन दाऊद इब्राहिम यांचे साथीदार यांना मुंबईतील विशेष न्‍यायालयाने १० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्‍यायालयाने जोशी यांच्‍यासह जमीरुद्दीन अन्‍सारी आणि फारुख अन्‍सारी यांनाही या प्रकरणात दोषी ठरवले आहे. तिघांनाही पाच लाखांचा दंड ठोठावण्‍यात आला आहे. जे.एम्. जोशी यांनी दाऊद इब्राहिमच्‍या ‘फायर गुटखा आस्‍थापना’ला २ लाख ६४ सहस्र रुपयांची ५ यंत्रे दुबईमार्गाने पाकिस्‍तानला पाठवली होती.

माणिकचंद गुटखा आस्‍थापनाचे मालक रसिकलाल धारीवाल यांच्‍यावरही दाऊदला साहाय्‍य केल्‍याचा आरोप आहे; पण वर्ष २०१७ मध्‍ये त्‍यांच्‍या मृत्‍यू झाल्‍याने ते या प्रकरणातून मुक्‍त झाले.