(म्हणे) ‘मला आणि माझे वडील फारूख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे ! – ओमर अब्दुल्ला यांचा सामाजिक माध्यमातून दावा

जर सरकारने असे केले असेल, तर ते योग्य असून अशा राष्ट्रघातक्यांना आणि हिंदुद्वेषींना आजन्म नजरकैदेत ठेवले पाहिजे, अशीच राष्ट्रप्रेमींची भावना आहे !

ओमर अब्दुल्ला नजरकैद

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – ऑगस्ट २०१९ नंतरचे हे ‘नवीन काश्मीर’ आहे. आम्हाला कोणत्या कारणास्तव आमच्या घरात बंद केले आहे ? त्यांनी (केंद्र सरकारने) मला आणि माझ्या वडिलांना आमच्या घरात बंदिस्त केले हे पुरेसे नव्हे काय ? आता त्यांनी माझी बहीण आणि तिची मुले यांनाही बंदिस्त केले आहे, अशी माहिती नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी सामाजिक माध्यमांत पोस्ट करून दिली आहे.

त्यांनी त्यांचे छायाचित्रही पोस्ट केले आहे. याआधी पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांना नजरकैद करण्यात आल्याचा दावा केला होता.