सुशांत सिंह याच्या बहिणीवरील गुन्हा रहित

मीतू सिंह हिच्यावर प्रविष्ट झालेला गुन्हा उच्च न्यायालयाने रहित केला

मुंबई – आत्महत्येचा संशय असलेल्या अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात त्याच्या बहिणीने पाठवलेले औषधाचे प्रिस्क्रिप्शन हाती लागले होते. देहलीतील रुग्णालयातून सुशांतसाठी वैद्यकीय चिठ्ठीनुसार घेतलेल्या औषधाने सुशांत याची स्थिती अधिक बिघडली, असे म्हटले जात होते. त्याची मैत्रीण रिया हिने अशा प्रकारचे आरोप त्याच्या बहिणीवर केले होते.

सुशांत याच्या बहिणींच्या विरोधातील याचिकेनंतर १५ फेब्रुवारीला बहीण मीतू सिंह हिच्यावर प्रविष्ट झालेला गुन्हा उच्च न्यायालयाने रहित केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली.