पीएच्.डी.चा उमेदवार नाव गोपनीय ठेवून तक्रार करू शकतो ! – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्‍यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !

Anil Vij Slams Kejriwal : केजरीवाल यांनी आधीच रामायण आणि भगवद्गीता वाचली असती, तर त्यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ उद्भवली नसती ! – अनिल विज, भाजप

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कारागृहात वाचण्यासाठी रामायण आणि भगवद्गीता या धर्मग्रंथांची मागणी केली आहे. यावर हरियाणाचे माजी गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी असे वक्तव्य केले आहे !

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची पुन्हा चौकशी होणार !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर १ एप्रिल या दिवशी सुनावणी झाली. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने वरील आदेश दिले.

आज भुजबळांवरील आरोपांविषयी परत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. गेल्या दीड वर्षापासून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिनांक मिळत नव्हता.

‘गहाळ’ खतांच्या पूर्व नोंदी !

भ्रष्टाचारी, कलंकित आणि गुन्हेगार यांच्याऐवजी ईश्वराचे भक्त असलेल्या सदस्यांच्या अधीन मंदिरांचे नियंत्रण हवे !

IT Notice To INC : आयकर विभागाकडून काँग्रेसला १ सहस्र ७०० कोटींची नोटीस !

लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

AAP Party Goa : गोव्यातील ‘आप’चे गोवा संयोजक अमित पालेकर यांच्यासह चौघांना ‘ईडी’चे समन्स

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ‘आप’चे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक यांना समन्स पाठवले आहे.

गोवा : सांगोल्डा पंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार !

उल्हास मोरजकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. संबंधित रक्कम पंचायतीच्या कामासाठीच वापरल्याचा त्यांनी दावा केला आहे; मात्र यासंबंधी ठोस पुरावे ते सादर करू शकले नाहीत.

केजरीवाल यांच्या अटकेला जर्मनीचा आक्षेप; भारताचे चोख प्रत्युत्तर !

अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा उभारून सत्ता हस्तगत केली. असे असतांना पाश्‍चात्त्य देश आणि प्रसारमाध्यमे यांनी भारतालाच दूषणे देणे, हा त्यांचा निवळ भारतद्वेष आहे !

असे आहेत आम आदमी पक्षाचे भ्रष्टाचाराचे आरोप असणारे नेते !

‘देहली मद्य घोटाळा प्रकरणात देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने ७ वेळा चौकशीसाठी समन्स बजावूनही ते उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांना १६ मार्च २०२४ या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता.