पणजी, २७ मार्च (वार्ता.) : अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी कह्यात घेतले आहे.
(सौजन्य : wion)
या घटनेनंतर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ‘आप’चे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि भंडारी समाजाचे नेते अशोक नाईक यांना समन्स पाठवले आहे.