बेंगळुरू येथील ख्रिस्ती शाळेत विद्यार्थ्यांना बायबल आणणे बंधनकारक केल्याने हिंदू संघटनांचा विरोध

हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?

तापी (गुजरात) येथे हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ख्रिस्ती कुटुंबाच्या विरोधात गुन्हा नोंद !

धर्मांध ख्रिस्त्यांचे दुःसाहस किती वाढले आहे, हे यातून दिसून येते. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतात धर्मांतरविरोधी कायद्याची नितांत आवश्यकता आहे !

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली होती.

नायजेरियात ख्रिस्तीबहुल गावांमध्ये झालेल्या जिहाद्यांच्या आक्रमणात ८० हून अधिक ठार !

या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे.

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

सरकार हिंदुविरोधी आणि ख्रिस्तीधार्जिणी नीती अवलंबत असल्यामुळे धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा वाढला आहे. हे रोखण्यासाठी तमिळनाडूमध्ये परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

यावरून माकपचा ‘लव्ह जिहाद’ला पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते. हे केरळमधील ख्रिस्त्यांना, चर्चसंस्थेला मान्य आहे का ? हे त्यांनी उघडपणे सांगितले पाहिजे !

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ध्येय ! – दिव्या नागपाल, हिंदुत्वनिष्ठ

‘हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे ध्येय आहे. त्यांची प्रतिमा डागाळली की, लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. असे झाले की, युवक ‘अन्य पंथ चांगले आहेत’, असे समजतात आणि त्यामुळे त्यांचा हिंदु धर्मावरील विश्वास नाहीसा होतो, हे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र आहे.’

‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने गणवेशाविषयी विचार करण्यासाठी बनवली समिती !

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये येथील अधिवक्त्यांनी त्यांच्या गणवेशाविषयी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात म्हटले आहे की, गणवेशाविषयी विचार करण्यासाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ती याविषयीचा अहवाल कौन्सिलला सादर करणार आहे.

न्यायमूर्तींवरील टीकेच्या विरोधात आंध्रप्रदेश न्यायालयाचा निवाडा !

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगितले की, ज्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे नोंद आहेत, त्या खासदार आणि आमदार यांच्या विरोधातील खटले स्वतंत्र न्यायालयामध्ये चालवले जावेत. प्रशासन हे लाचखोर आणि सत्ताधारी यांच्या इशाऱ्यावर चालते. आता न्यायव्यवस्थेची ही स्थिती असेल, तर यावर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमात्र उपाय आहे.’