तापी (गुजरात) येथे हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ख्रिस्ती कुटुंबाच्या विरोधात गुन्हा नोंद !

तापी (गुजरात) – येथे ख्रिस्ती तरुणावर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी एका ख्रिस्ती कुटुंबावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मानसीबेन गामित या तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.


मानसीबेन यांनी सांगितले की, ‘योहान नावाच्या ख्रिस्ती तरुणावर माझे प्रेम होते. योहानच्या कुटुंबाला याविषयी ठाऊक होते. मी त्यांच्या घरीही जात असे. एक दिवस योहान याने मला त्याच्या घरी बोलावले आणि तेथे योहान याच्या वडिलांनी माझ्या हातातील दोरा कापला आणि योहानच्या आईने माझ्या कपाळावर अन् पायांवर तेल लावले. या वेळी माझी मैत्रिणही तेथे होती. तिलाही असेच करण्यात आले. त्यानंतर योहानाच्या वडिलांनी सांगितले की, तुम्ही अपवित्र होता. आता मी तुमचे शुद्धीकरण केले आहे. आता ४ दिवस तुम्ही आमच्या घरीच रहायचे. यानंतर धर्मांतराच्या काही कृती करण्यात आल्या. याची माहिती मी माझ्या आई-वडिलांना दूरभाष करून दिल्यावर त्यांनी मला घरी नेेले.’

संपादकीय भूमिका

धर्मांध ख्रिस्त्यांचे दुःसाहस किती वाढले आहे, हे यातून दिसून येते. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतात धर्मांतरविरोधी कायद्याची नितांत आवश्यकता आहे !