५ संशयित कह्यात !
पुणे – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध शहरांमध्ये बेकायदेशीर बनावट ‘कॉल सेंटर’वर धाडी घालून ५ संशयितांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला. बनावट ‘कॉल सेंटर’ चालवणार्या टोळीने अमेरिकेसह अन्य देशांतील नागरिकांची फसवणूक केली आहे. या आरोपींना पुण्यातील न्यायालयात उपस्थित केले असून सीबीआयच्या अधिकार्यांनी पुण्यासह भाग्यनगर, वाराणसी, विशाखापट्टणम् आणि कर्णावती या शहरांत धाडी घातल्या. अधिकार्यांनी आरोपींच्या ‘कॉल सेंटर’ मधून ५० भ्रमणभाषसंच, ३८ संगणक आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. आरोपींनी रिमोट ऍक्सेस या प्रणालीचा उपयोग करून परदेशी नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. आंतरराष्ट्रीय ‘गिफ्ट कार्ड’ खरेदी करण्याचे आमीष दाखवून आरोपींनी २ परदेशी नागरिकांची २० सहस्र डॉलरची फसवणूक केली.