SC Questioned On WAQF Bill : हिंदूंच्या धर्मादाय मंडळात मुसलमानांना अनुमती मिळेल का ?

वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

नवी देहली : वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणार्‍या ७३ याचिकांवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला कायद्यातील अनेक तरतुदींविषयी कठोर प्रश्‍न विचारले. न्यायालयाने केंद्रीय वक्फ परिषदेत मुसलमानेतरांना समाविष्ट करण्याच्या तरतुदीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आणि सरकारला विचारले की, ‘मुसलमानांना हिंदु धर्मादाय मंडळांचा भाग बनण्याची अनुमती दिली जाईल का ?’ या याचिकांवर १७ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.

सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना सांगितले की, २ प्रश्‍नांचा विचार केला पाहिजे. पहिला प्रश्‍न म्हणजे सर्वोच्च न्यायालय याचिका उच्च न्यायालयात पाठवेल का ? आणि याचिकाकर्त्यांना कोणत्या सूत्रांवर चर्चा करायची आहे ?