|

नाशिक – येथील काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा १६ एप्रिलच्या पहाटे ५.३० वाजता हटवण्यात आला. दर्ग्याच्या तोडकामाला १५ एप्रिलच्या रात्रीच प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने सातपीर दर्गा हटवण्याचा आदेश दिल्याने मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिकांनीही तशी सिद्धता दर्शवली होती; पण तोडकामाच्या वेळी ४०० मुसलमानांच्या जमावाने येऊन तेथे दगडफेक केली. यामुळे तणाव निर्माण झाला. या वेळी ५०० पोलीस तैनात होते.
Nashik: Mob of about 400 Muslims pelt stones in protest against removal of unauthorized Saat Peer Baba Dargah – 15 accused arrested
31 Police officers injured in the stone-pelting
57 two-wheelers of suspected attackers seized
Arrogant religious bigots repeatedly assaulting… pic.twitter.com/5cR2vVAGmJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 16, 2025
पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या !
नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले, ‘‘दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ करत असतांनाच उस्मानिया चौकाच्या बाजूने मुसलमानांचा जमाव आला आणि त्याने गोंधळ घातला. दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनीही त्यांना समजावले; मात्र तरीही त्यांनी दगडफेक चालू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. जमावाच्या दगडफेकीत ३१ पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. जमावातील संशयित आक्रमणकर्त्यांच्या ५७ दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.’’

नाशिक महापालिकेच्या नोटिशीला न जुमानल्याने शेवटी तोडकामाची कारवाई !
सध्या काठे गल्ली परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून येथे तणावपूर्ण शांतता आहे. दर्ग्याचे ९० टक्के बांधकाम पाडलेले आहे. या पार्श्वभूमीवर काठे गल्ली ते भाभानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेने १५ दिवसांत सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती; मात्र बांधकाम न हटवल्याने पालिकेने दर्गा पाडला.
संपादकीय भूमिका
|