अंधेरीतील तरुणीची २ लाख रुपयांची फसवणूक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – केंद्रीय अन्वेषण शाखेचा अधिकारी असल्याचे खोटे सांगत हॉटेलमध्ये ‘डिजिटल’ अटकेत ठेवून अंगझडतीच्या नावाखाली अंधेरी येथील तरुणीला विवस्त्र होण्यास भाग पाडले. तिचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर अटक आणि अपकीर्तीची भीती दाखवत तिच्याकडून २ लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी तरुणीच्या अटकेनंतर अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही तरुणी अंधेरी येथे एका खासगी कार्यालयात काम करते. संपर्क करणार्‍याने तिला तुमचा एका गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे सांगत गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी हॉटेलमध्ये जाऊन चौकशी करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. हॉटेलमध्ये जाऊन व्हिडिओ कॉलवरील व्यक्तीने तिच्या बँक खात्याची माहिती काढली. तिच्या खात्यातून १ लाख ७८ सहस्र रुपये परस्पर वळते केले आणि अंगझडतीविषयी सांगून त्यानंतर तिचा व्हिडिओ प्रसारित केला.

संपादकीय भूमिका :

अशा फसव्या संपर्कांच्या आहारी न जाता सतर्क रहा !